नंदूरबार l प्रतिनिधी
९ ऑगस्ट निमित्त विविध कार्यक्रम करण्यासंबंधी मोलगी सातपुडा परीसरात कार्यकर्त्यांची दि. 24 जुलै रोजी पहिली बैठक संपन्न झाली. बैठकीत सर्वानुमते विविध निर्णय घेण्यात आले.
मोलगी येथे होणाऱ्या विश्व आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात ही ढोल ताशांच्या गजरात रँलीने अनु आश्रम शाळा ते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोलगी पर्यंत होणार आहे. कार्यक्रम स्थळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोलगी येथे निश्चित करण्यात करण्यात आले आहे. तसेच खर्च हिशोब समिती,९ आँगस्ट वर्गणी समिती,विश्व आदिवासी उत्सव समिती, अशा विविध समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विश्व आदिवासी दिवस नियोजन बैठकीला सी.के. पाडवी, करमसिंग पाडवी, डॉ. दिलवरसिंग वसावे, ब्रिजलाल पाडवी,रामजी पाडवी,दिनकर पाडवी,रोशन पाडवी,मनोज तडवी,सिंगा वसावे,तेजला वळवी,गजमल वसावे,दाजला पाडवी,भतेश पाडवी,उमेश वलवी,संदिप वळवी, सुमित्रा वसावे,
करमसिंग पाडवी,पंजा वळवी,राकेश वसावे,गुलाबसिंग वसावे,जयसिंग पाडवी,विजय वसावे,रामसिंगदादा वळवी,सरदार वसावे,वाण्यादादा वळवी,रामा तडवी,पृथ्वीसिंग तडवी,खेमसिंग वलवी,किसन पाडवी,पी.टी. पाडवी,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.