नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात राजकारण सत्ता बदलाचे पडसाद नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील राजकारणात मोठी ढवळाढवळ झाली आहे. याचे परिणाम जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांवरही पडणार आहे.
नंदुरबार आदिवासी बहुत जिल्हा सुरवातीपासूनच काँग्रेसचा गड राहिलेला आहे परंतु गेल्या काही वर्षापासून सातपुड्याच्या अति दुर्गम भागात ही शिवसेना पक्ष वाढत असतानाच महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातूनच आमदारांचा वेगळा गट तयार करून सत्ता बदल घडवून आणलेली आहे. याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यात स्पष्ट होताना दिसत असून तळागाळात शिवसेना पक्ष वाढत असतानाच मोठे भगदाड पडले आहे.
आज दि. 24 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलाबार हिल बंगल्यावर नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटाला समर्थन देणार आहेत, त्यामुळे दोन नगरपरिषद, दोन पंचायत समिती सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी शिवसेनेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होणार आहे.
माजी आमदार चंद्रकातं रघुवंशी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील जवळपास दोन हजार कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर करणार आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत भाजपाचे कमळ हाती घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे जल्लोषात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे शिवसेना पक्षाला जिल्ह्यात मोठे भगदाड पडले आहे.
एकूणच नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचा गड शिवसेनेच्या ताब्यात जाईल असे वाटत असतानाच राजकारणातील मोठी उलाढाल झाल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपण नेमकं कोणत्या गटामध्ये जायचं याचा प्रश्न पडला आहे.