नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा येथे आज दि.23 जुलै रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास कॉलेज रस्त्यावरील पाच ते सहा दुकानाचे शटर तोडण्याच्या प्रयत्न फसला आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की तळोदा शहरातील गजबजलेल्या कॉलेज रस्त्यावरील किराणा दुकान, सबमर्शिबल दुकान, आदि सह तिनचार किराणा दुकानाचे दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी तोडून चोरी करण्याच्या प्रयत्न केला.

त्यात चिराग प्रोव्हिजन या किराणा दुकानाच्या गल्यातून वीस ते पंचवीस हजार रुपये चोरी केले. असुन तशी फिर्याद दुकानदार हुकूमचंद जैन यांनी पोलिस ठाण्यात दिली असुन बाकी दुकानदार यांच्या दुकानातुन काहीच सामान न चोरल्याने तसा जबाब लिहून घेण्यात आला आहे.
यावेळी तात्काळ घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत यांनी सर्व दुकानदार बांधवांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे नुकसानी बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेतली व प्रत्येक दुकानदार नी आपल्या दुकानात कमीत कमी दोन सी. सी. टी.व्ही कॅमेरे लावली पाहिजे रात्रीसाठी सर्व दुकानदार मिळून वाचमन ठेवला पाहिजे असे सांगितले.
तर सदर घटनेकामी पोलीस अधिकारी यांना डॉग कॉड मागविण्याच्या व सी. सी टीव्ही कॅमेरे चेक करुन चोरट्यांचा तपास लावण्याचा सुचना दिल्या.
याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार, अल्पेश जैन, प्रसाद सोनार, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक जितेंद्र सुर्यवंशी, शाम राजपूत, शिवसेनेचे गौतमचंद जैन, प्रविण जैन, मनोज भामरे, सुभाष जैन,नगरसेवक हिंतेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप परदेशी, गुंडू जैन, दिपक सुर्यवंशी, संजय माळी, जिवन माळी आदी सह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमीत कुमार बागुल हे करीत आहे.








