Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोंडाईबारी घाटात १० लाखाच्या सुगंधीत तंबाखूसह ४० लाखाचे कंटेनर जप्त, एकास अटक

team by team
July 19, 2022
in क्राईम
0
कोंडाईबारी घाटात १० लाखाच्या सुगंधीत तंबाखूसह ४० लाखाचे कंटेनर जप्त, एकास अटक

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार पोलीस व अन्न औषध प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कोंडाईबारी घाटात सुगंधीत तंबाखूच्या वाहतुकीवर धडक कारवाई करत ९ लाख ७२ हजार रुपये किंमतीची सुगंधीत तंबाखूसह ४० लाखाचे कंटेनर जप्त करून एकास अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना माहिती कळवून कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते . मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे

 

विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या मदतीने दि. १८ जुलै रोजी कोंडाईबारी घाटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सापळा रचला . विसरवाडी येथुन कोंडाईबारी घाटाच्या दिशेने येणार्‍या वाहनांची तपासणी करीत असतांना एक अशोक लेलॅण्ड कंपनीचे कंटेनर भरधाव वेगाने येतांना दिसुन आल्याने

पोलीस पथकातील अमंलदारांनी हाताच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा दिला . परंतु वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने वाहन पुढे नेले . पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी शिताफीने वाहनाचा पाठलाग करुन ते वाहन थांबवुन ताब्यात घेतले.

 

वाहनावरील वाहन चालका किशोर गुलाब बुवाडे रा . हिवरा वासुदेव ता . मुखेड जि . छिंदवाडा , मध्य प्रदेश यास कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यामुळे पोलीसांनी दोन पंचासमक्ष वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्या दिसून आल्या . सदर गोण्या उघडून पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीत तंबाखू मिळुन आली .

आरोपीतास सदरची सुगंधीत तंबाखू बाबत विचारपुस केली असता त्याने गुजरात राज्यातील वापी येथुन विकत घेवून नागपूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले . ताब्यात घेण्यात आलेला अशोक लेलॅण्ड कंपनीचा कंटेनर ( क्र.एम.एच.- ४० सी.डी. ७८९६) यात ९ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या ३० कि.ग्रॅ . वजनाच्या सुगंधीत तंबाखूच्या एकुण १०८ गोण्या, ४० लाखाचे अशोक लेलॅण्ड कंपनीचा कंटेनर असा एकूण ४९ लाख ७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन संशयीत आरोपी किशोर गुलाब बुवाडे याच्याविरुध्द् विसरवाडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम १८८,१७२,२७३,३२८ , सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

 

सदरची सुगंधीत तंबाखू ही कोणाकडून विकत आणली तसेच कोणास विकण्यास जात आहे याबाबत पोलीस तपास करीत असून दोषींविरुद् कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली

विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक नितीन पाटील , अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार , विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिनेश चित्ते , पोलीस नाईक अनिल राठोड , पोलीस कॉन्सटेबल लिलेश पाडवी , अतुल पानपाटील , नितीन ठाकरे यांनी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

आई सोबत गुरे चारण्यासाठी गेलेल्या ४ वर्षीय बालकाचा बिबट्याने हल्लात मृत्यू

Next Post

नंदूरबार येथे अट्टल गुन्हेगारास न्यायालयाने ठोठावला तीन वर्ष सश्रम कारावास

Next Post
नंदूरबार येथे अट्टल गुन्हेगारास न्यायालयाने ठोठावला तीन वर्ष सश्रम कारावास

नंदूरबार येथे अट्टल गुन्हेगारास न्यायालयाने ठोठावला तीन वर्ष सश्रम कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add