Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे अट्टल गुन्हेगारास न्यायालयाने ठोठावला तीन वर्ष सश्रम कारावास

team by team
July 19, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथे अट्टल गुन्हेगारास न्यायालयाने ठोठावला तीन वर्ष सश्रम कारावास

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील अट्टल गुन्हेगारास न्यायालयाने ३ वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान नंदुरबार न्यायालयात अतिशय जलदगतीने खटला चालवुन अवघ्या ५० दिवसातच खटल्याची सुनावणी पुर्ण करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हितेश अशोककुमार जैन रा . न्यु वैशाली नगर , एम . एल . टाऊन नंदुरबार यांचे नंदुरबार शहरातील गणपती मंदीराजवळील दुकानाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले ३० हजार रुपये चोरी झाल्याने त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भा.द.वि. कलम ४५७,३८० अन्वये अज्ञात आरोपीताविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला होता .

सदर गुन्ह्याबाबत संशयीत आरोपी संतोष दिलीप तिजवीज रा . बाहेरपुरा नंदुरबार यास तात्काळ अटक करून त्याच्याकडून रोख १३ हजार ३२० रुपये हस्तगत करण्यात आले . नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्दतीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते .

तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी संतोष तिजवीज याच्याविरुध्द् दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार विनोद चव्हाण यांच्या न्यायालयात २२ दिवसातच सादर केले होते . मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांनी साक्षीदारांचे जबाब , पंच , जप्त मुद्देमाल आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष तसेच आरोपी संतोष तिजवीत हा सराईत गुन्हेगार असल्याने यासर्व बाबींचा विचार करुन आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असतांनाच खटला चालविण्याचे ठरविले

मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांनी अतिशय जलदगतीने खटला चालवुन अवघ्या ५० दिवसातच खटल्याची सुनावणी पुर्ण करुन आरोपी संतोष दिलीप तिजवीज यास ३ वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे .

सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील ,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे , नंदुरबार शहरपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते यांनी केला असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड . सुनिल पाडवी यांनी पाहिले होते . पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस हवालदार गणेश धनगर , पोलीस नाईक मनोज साळुंखे , गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

कोंडाईबारी घाटात १० लाखाच्या सुगंधीत तंबाखूसह ४० लाखाचे कंटेनर जप्त, एकास अटक

Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित कार्यक्रमांचे काटेकोरपणे नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add