जळगाव l प्रतिनिधी
इंडोरहून अंमळनेरकडे निघालेली बस नर्मदा नदीत कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील धार येथे ही घटना घडली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. नदीच्या पुलावरील कठडा तोडून ही बस नदीपात्रात कोसळली.

अपघातग्रस्त बस जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची असून या बसचे चालक चंद्रकांत एकनाथ पाटील व वाहक प्रकाश श्रावण चौधरी असे नाव आहे.
ही बस पंढरपूर जाऊन आल्यावर इंदोर पाठवली होती. बस ड्रायव्हर ढेकू रोडवरील गायत्री नगर येथील रहिवासी आहेत.
तांत्रीक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सविस्तर असे की, अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन ९८४८ क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती.
इंदूरहून अंमळनेरला निघाली होती बस – इंदूरहून अंमळनेरकडे जाणारी महाराष्ट्र रोडवेजची बस धार जिल्ह्यातील खलघाट संजय सेतूवरून कोसळल्याने १3 जण ठार झाले आहेत. या अपघातातील १५ जणांना वाचवण्यात आतापर्यंत यश आले आहे, असे मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
या पुलावरून जात असतानाच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चालकाचे बसवरील सुटल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 जण अद्याप बेपत्ता आहेत. या अपघातग्रस्त बसला नदी बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अपघातस्थळी एसटीचे अधिकारी रवाना झाले आहेत.
जळगावात नियंत्रण कक्ष
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे
मृतांची नावे
1.चेतन राम गोपाल जांगिड (जयपूर, राजस्थान)
2.जगन्नाथ हेमराज जोशी (वय 70, मल्हारगढ उदयपूर, राजस्थान)
3.प्रकाश श्रवण चौधरी (40 अमळनेर, जळगाव)
4.नीबाजी पिता आनंदा पाटील (वय 60, अमळनेर)
5. कमला नीबाजी पाटील (वय 55, अमळनेर)
6.चंद्रकांत एकनाथ पाटील (वय 45 , अमळनेर)
7. अरवा र्तजा बोरा (वय 27,मूर्तिजापूर, अकोला)
8.सैफुद्दीन ब्बास निवासी नूरानी (इंदूर)








