नंदुरबार l प्रतिनिधी
विसरवाडी पोलीस स्टेशनला 12 जुलै 2022 रोजी शेगवे गावांचे सरपंचांनी भ्रमणध्वनीने कळविलेल्या माहितीनुसार एक अनोखळी वेडसर महिला वय अंदाजे 30 ते 35 वर्ष नाव गाव माहिती नाही ही सकाळी 7 वाजेच्या सुमारास शेगवे गावाच्या नदीच्या पाण्यात उडी मारतांना शेगवे गावातील नागरीकांनी पाहिले या ठिकाणी इतर नागरीकांनी तिचा नदीत शोध घेतला असता तिचा मृतदेह मिळून आला आहे.
सदर अनोळखी मयत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. व त्याचे वारस मिळून आलेले नाहीत. तरी सदर अनोळखी महिलेबाबत काही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक विसरवाडी येथे संपर्क साधावा असे सहायक पोलीस निरीक्षक,विसरवाडी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.