Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलांच्या मदतीसाठी नंदुरबारात सखी वन स्टॉप सेंटर

team by team
July 15, 2022
in राज्य
0
महिलांच्या मदतीसाठी नंदुरबारात सखी वन स्टॉप सेंटर

नंदुरबार | प्रतिनिधी
कौटुंबिक हिंसाचारासह लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, छळ, जाच, सिड हल्ले, सायबर क्राइम आणि बाल लैंगिक शोषणग्रस्त पीडितांनी नंदुरबार येथे सखी वन स्टॉप सेंटरमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रा.वा.बिरारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर संकटग्रस्त, पीडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, आवारात प्रशिक्षण इमारत, पहिला मजला, नंदुरबार येथे सुरू करण्यात आले आहे.

या कार्यालयाच्या माध्यमातून महिलांना २४ तास मदत केली जाते. सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटरच्या मार्फत महिलांना पुढील सात प्रकारच्या तातडीच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात. आपत्कालीन/ बचाव सेवाअंतर्गत आरोग्य अभियान १०८ सेवा, पोलीस मदत जेणे करुन हिंसाचाराने बाधित महिलेला वेळेवर जवळील आरोग्य, कायदेविषयक ठिकाणी पाठवुन योग्य त्या सेवा दिल्या जातात.

 

वैद्यकीय मदतअंतर्गत हिंसाचाराने पीडित महिलेची आरोग्य तपासणी होऊन तिला वेळेवेर औषधोपचार करण्यात येते. पोलीस मदत सेवा अंतर्गत हिंसाचाराने पीडित महिलेला एफआयआर, एनसीआर, व डीआयआर दाखल करण्यासाठी मदत केली जाते. मानसिक सामाजिक समर्थन/ समुपदेशन अंतर्गत हिंसाचाराने पीडित महिलेला प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे समुपदेशनाची सेवा देण्यात येते.

 

कायदेशिर मदत आणि समुपदेशन अंतर्गत पीडित महिलांना न्याय मिळण्याची सोय करणे, कायदेशीर मदत आणि समुपदेशन, विधी सेवा प्राधिकरणामार्फत पीडीत महिलेला मोफत विधी सेवा मिळवून संबंधित महिलेला न्याय मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जातो.तात्पुरता निवारातर्ंगत पीडित महिलांना पाच दिवसासाठी तात्पुरता निवाराची व्यवस्था करण्यात येते.

 

व्हीडीओ समुपदेशन सुविधा अंतर्गत व्हीडीओ समुपदेशन, पोलिसांची मदत, सायको- सोशल कोर्ट आदी सुविधा पुरविण्यात येतात.संकटग्रस्त महिलांनी प्रत्यक्ष, समाज कार्यकर्त्या किंवा पोलीसामार्फत सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटरशी संपर्क साधू शकता.

 

यासाठी ९४२००४२४६६ या क्रमांकावर २४ तास सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे चाईल्ड हेल्पलाईन १०९८, घरगूती हिंसाचारासाठी १८१ , संकटात त्वरीत मदतीसाठी १०९० या हेल्पलाईन वर संपर्क करु शकतात.सखी वन स्टॉप सेंटरचा पत्ता असा : सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटर, जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात प्रशिक्षण इमारत,नंदुरबार येथील पहिला मजला येथे संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रा.वा.बिरारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.आमश्या पाडवी यांची पूरग्रस्त वडफळी आश्रम शाळेसह आरोग्य केंद्राला भेट ,नागरिकांशी साधला संवाद

Next Post

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी

Next Post
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add