Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मेडिकल युनिटच्या वाहनाचा खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते शुभारंभ

team by team
July 11, 2022
in राजकीय
0
मेडिकल युनिटच्या वाहनाचा खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते शुभारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धडगाव व तळोदा येथील अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी दोन मोबाईल मेडिकल युनिट (फिरते रुग्णालय सेवा ) च्या वाहनाचा शुभारंभ खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

जिल्हा परिषद, नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड,

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीचंद कोकणी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.एन.एन.बावा, वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड, आर.डब्ल्यू प्रमोशनचे मॅनेजर शशिकांत सोनी, जिल्हा समन्वयक निलेश शर्मा तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

या मोबाईल युनिट वाहनामार्फत धडगाव व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहचत नाही अशा ठिकाणी ह्या मोबाईल युनिटच्या मार्फत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, 0 ते 6 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी,

गरोदर व स्तनदामाता तपासणी, साथजन्य परिस्थितीतील उपचार, सिकलसेल, ॲनेमिया, रक्त,लघवी तपासणी तसेच आरोग्य विषयक समुपदेशन व उपचार या मोबाईल युनिटच्या मार्फत करण्यात येणार आहे. तसेच तपासणी करतांना जोखीमग्रस्त रुग्ण आढळून आल्यास त्यांना त्वरीत पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

या मोबाईल युनिट वाहनात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारीका, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक फॉर्मासिस्ट, वाहनचालक असे कर्मचारी वर्ग या युनिटमध्ये राहणार असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नागन नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात राबविणार ‘हर घर तिरंगा’ उपक्रम: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात राबविणार ‘हर घर तिरंगा’ उपक्रम: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add