Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात राबविणार ‘हर घर तिरंगा’ उपक्रम: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
July 11, 2022
in राज्य
0
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार l प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमाणसात रुजावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्याबाबत विविध सूचना दिल्या आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे.

तसेच शासनाच्या निर्देशानुसार 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत अमृत महोत्सवानिमित्त ‘ स्वराज्य महोत्सव’ उपक्रम जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर राबविण्यात बाबत कार्यक्रमांचे सुक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेले सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादीपासून तयार केलेल्या कापडाचा असावा. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र,

स्वस्त भाव धान्य दुकान, सहकारी संस्थांनी देखील हा उपक्रम राबवावा, हा उपक्रम राबवितांना भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल व त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मेडिकल युनिटच्या वाहनाचा खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

आंबेबारा,धनीबारा, विसरवाडी,खोलघर लघु प्रकल्पांच्या नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add