Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

देहली धरणाचे पाणी घुसले गावांमध्ये, पहिल्याच पावसात अंबाबारी गांव गेले पाण्याखाली

team by team
July 11, 2022
in सामाजिक
0
देहली धरणाचे पाणी घुसले गावांमध्ये, पहिल्याच पावसात अंबाबारी गांव गेले पाण्याखाली

नंदूरबार l प्रतिनिधी

चाळीस वर्षानंतर पूर्ण झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील देहली प्रकल्प जवळील गाव खेड्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी. देहली प्रकल्पात पहिल्याच पावसात अंबाबारी गांव पाण्याखाली गेले आहे, तर दसरापादर गावात ही पाणी शिरल्याने प्रशासनाचे पुनर्वसनाचे दावे फोल ठरले आहेत.

अक्कलकुवा तालुक्यातील देहली मध्यम प्रकल्पाचे काम जवळपास 40 वर्षानंतर पूर्ण झाले आहे, यंदा पहिल्याच वर्षी गळाभरणीचे काम पूर्ण करून पाण्याची अडवणूक केली आहे. देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून

सद्यस्थितीत पाणीपातळी 189.60 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्पाची महत्तम पूर पातळी 200.50 मीटर असून हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने देहली नदीकाठावरील डाव्यातीरातील रायसिंगपूर,

पुर्नवसन आंबाबारी, जुना नांगरमुथा, नवा नांगरमुथा, घोटपाडा, कोराई, खापर तर उजव्या तीरावरील रांझणी, घुनसी, लालपुरा, वल्ली, कोराई तसेच उखळसाग, भोयरा, सोनपाटी, कोयलीविहिर, खटकुवा, पोहरा, गंगापुर, घंटाणी, वाकाधामन, अंकुशविहीर, कंकाळी या कालव्यावरील गावातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

चाळीस वर्षानंतर पूर्ण झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील देहली प्रकल्प जवळील गाव खेड्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी. देहली प्रकल्पात पहिल्याच पावसात अंबाबारी गांव पाण्याखाली गेले आहे, तर दसरापादर गावात ही पाणी शिरल्याने प्रशासनाचे पुनर्वसनाचे दावे फोल ठरले आहेत.

आज सकाळपासूनच अतिरिक्त जिल्हाधिकारी मैयंक घोष यांनी देहली प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे. धरण परिसरातील नागरिकांना असुरक्षितता वाटत असल्याने सामाजिक कार्यकर्ते नागेश पाडवी यांनीही देहली प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे.

देहली काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बोरद येथे विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

उमर्दे येथे विठ्ठल-रुखमाई मंदिरात विविध कार्यक्रम उत्साहात

Next Post
उमर्दे येथे  विठ्ठल-रुखमाई मंदिरात विविध कार्यक्रम उत्साहात

उमर्दे येथे विठ्ठल-रुखमाई मंदिरात विविध कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add