नंदुरबार l प्रतिनिधी
येथील अंधारे हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय आरेाग्य अभियानातंर्गत बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आरबीएसके. जिल्हा रूग्णालय व लायन्स,लायनेस फेमिना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालकांची हृदयरोग तपासणी शिबीरात ११० बालकांची हृदयरोग तपासणी करण्यात आली.
या शिबीराचे उध्दाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रोजेक्ट चेअरमन डॉ.दिपक अंधारे,डॉ.प्रसाद अंधारे,डॉ.निलेश तावडे,लायन्सचे अध्यक्ष सतिष चौधरी,सचिव उध्दव तांबोळी,श्रीराम दाउतखाने, शंकर रंगलानी,शेखर कोतवाल,राहुल पाटील, डॉ.सी.डी.महाजन,लायनेसच्या अध्यक्षा शीतल चौधरी,सुप्रिया कोतवाल,मीनल म्हसावदकर, कांचन मुलानी अदि उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा हा आकाक्षीत असुन कुपोषीत बालकांचे प्रमाण जिल्हयात अधिक आढळून येते.व त्याकरीता स्वंतत्र कक्ष जिल्हयात कार्यान्वयीत आहे. तसेच बालकांची काळजी घेणे साठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आपल्या बालकामध्ये ओठ व नखे निळसर होणे, दुध पितांना थकवा,अथवा घाम येणे, ह्दयाचे ठोके कमी जास्त होणे, हदयात विशीष्ठ प्रकारचा आवाज ऐकु येणे, धाप लागणे, वांरवार सर्दी होणे, चक्कर येणे आदी लक्षणे बालकांमध्ये असल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालय, डॉ. अंधारे हॉस्पीटल येथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे व लायन्स क्लब नंदुरबार यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
या शिबीरात ११० बालकांची हृदयरोग तपासणी करण्यात आली.शिबीर यशस्वीतेसाठी निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.सुलोचना बागुल जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक ,मनोहर ढिवरे, जिल्हा समन्वयक डॉ.अमोल मोरे, डॉ.अशोक चकोर,डॉ.गणेश बोराने, डॉ.सोनाली कुलकर्णी, डॉ.सायली मोडक, डॉ. प्रिती वसावे, डॉ.विदया वसावे, डॉ.परेश चावडा,डॉ.विलास भामरे तसेच औषध निर्माता व परिचारीका आदीनी परिश्रम घेतले. अशा मोफत शिबीरात जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान जिल्हा रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.