नंदूरबार l प्रतिनिधी
पोलीस व इतर विभागांमध्ये कर्मचारी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे नाशिक विभागात नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग, नाशिक कार्यालयाच्या प्र.उपसंचालक सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
5 टक्के खेळाडू आरक्षणांतर्गत नाशिक विभागतील नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येते.
यामध्ये शालेय,क्रीडा संघटना,विद्यापीठ, आदिवासी,दिव्यांग स्पर्धांच्या क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येते. विविध शासकीय भरतींच्या अनुषंगाने प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी आपल्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी तात्त्काळ करावी. अधिक माहितीसाठी उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधवा, असेही श्रीमती पाटील यांनी कळविले आहे..








