Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी हरित नंदुरबारसाठी प्रयत्न करावे : पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी याचे निर्देश

team by team
July 8, 2022
in राज्य
0
सातपुड्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी हरित नंदुरबारसाठी प्रयत्न करावे : पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी याचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, महसूल, वन, रोजगार हमी व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने येत्या पाच वर्षांत नंदुरबार जिल्ह्यात मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करुन हरित नंदुरबारसाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे. असे निर्देश प्रधान सचिव, वने तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसामुंडा सभागृहात झालेल्या वन, कृषी व रोहयो विभागाच्या आढावा बैठकीत पालक सचिव श्री. रेड्डी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, मुख्य वनसंरक्षक, (धुळे) दिगंबर पगार उपस्थित होते.

पालक सचिव श्री. रेड्डी म्हणाले, सातपुडा हे महाराष्ट्राचे वैभव असून या भागात वन विभागाच्या मोठ्या प्रमाणात वन जमीन उपलब्ध आहे. या जमिनीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व वन विभागाच्या सहकार्याने वृक्ष लागवडीची मोहिम राबवावी. यासाठी मोठ्या प्रमाणात रोपांची आवश्यकता लक्षात घेवून वन विभागाने रोजगार हमी योजनेतंर्गत वन विभाग व सामाजिक वनीकरणच्या रोपवाटीकेत जास्तीत जास्त रोपे तयार करावी.

वन विभागाच्या ताब्यातील मोकळ्या जागांवर वृक्ष लागवडीसाठी सुक्ष्म नियोजन करावे. वृक्ष संवर्धनाबरोबरच स्थानिक लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यासाठी दिर्घकाळ उत्पन्न देणाऱ्या आंबा, पेरु, सिताफळ, बाबु, आवळा, चारोळी या वृक्षांची रोपे तयार करावीत. कृषी विभागाने फळबाग लागवड योजनेतंर्गत जिल्हृयात जास्तीत जास्त फळबाग लावगडीचे उद्दीष्ट ठेवावे.

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वृक्षलागवड व जंगलाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांचे प्रबोधन करुन त्यांना वृक्ष संवर्धनातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराची माहिती देण्यासाठी ग्रामसभांचे आयोजन करावे. जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी वन विभागाने मनरेगातंर्गत अधिकाधिक कामे त्यांना उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, हरित नंदुरबार अभियान राबविण्यासाठी आवश्यक निधी व सर्व विभागांचे सहकार्य उपलब्ध करुन देण्यात येईल. मुख्य वनसंरक्षक श्री. पगार यांनी वन विभागामार्फत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री.मोरे, उपवनसंरक्षक श्री.भवर, सामाजिक वनीकरणाच्या रेवती कुलकर्णी, कृषी विभागाचे श्री. भागेश्वर यांनी त्यांच्या विभागामार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, प्रांताधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, कल्पना निळ-ठुंबे, नितीन सदगीर, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सामाजिक वनीकरणाच्या रेवती कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, सर्व तहसिलदार, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक

Next Post

तोरणमाळ येथे पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी स्थानिक लोकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add