नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील शेलकुवीचा तिसफळीपाडा येथील एकाचे अपहरण करुन डांबून ठेवल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील शेलकुवीचा तिसफळीपाडा येथील रमेश मान्या पावरा यांना भरत माळी व इतर चार इसमांनी वाहनात बसवून शहादा येथे काम असल्याचे सांगून गेले.
मात्र त्यांनी रमेश पावरा यांना जबरदस्तीने शहादा येथे न नेता सोलापूर तालुक्यातील टेंभूर्णी येथील बाबळगाव येथे डांबून ठेवले. याबाबत जोसनाबाई रमेश पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय मनोरे करीत आहेत.








