चिनोदा | प्रतिनिधी
तळोदा शहरातून ७० भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. दि.२७ सोमवारी रोजी सकाळी दत्त मंदिराचे दर्शन घेऊन यात्रेकरूंनी बाबा भोले चा जयघोष करत यात्रेसाठी भाविक निघाले.
२७ जून रोजी तळोदा येथून इंदोर रेल्वे स्थानकावरून उधमपूर एक्स्प्रेसने यात्रेकरू रवाना झाले आहेत. यात्रेचा दुसऱ्या समूहात म्हणजेच १ जुलै रोजी पेहलगाम येथून यात्रेस प्रारंभ झाला.
तळोदा येथील साधारणत: ७० भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत. यात्रेत आश्विन परदेशी, सुभाष मराठे, वसंत पाटील, संदीप होळकर, महेंद्र गिरासे, संतोष जावरे, लक्ष्मण माळी, शशिकांत सुर्यवंशी, घनश्याम कलाल,
पंकज तांबोळी, विकास माळी, हंसराज राजकुळे, कैलास शेंडे, इंद्रसिंग गिरासे, बबन माळी, गोकुळ पवार, विजयसिंग राजपूत, सुधाकर मराठे यांच्यासह ७० यात्रेकरू आहेत. या यात्रे दरम्यान आरोग्याचे प्रश्न उद्भवल्यास सुरत येथील डॉ.विपुल पटेल हे देखील त्यांच्या समूहात आहेत.