शहादा l प्रतिनिधी
राज्य सरकारच्या नवीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी राजभवन मुंबई येथे संपन्न झाल्यानंतर येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी स्टेट बँक चौकात जल्लोष साजरा केला.
महाराष्ट्र राज्याच्या नवनियुक्त मुख्यमंत्रीपदाची एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी शपथ घेतली.त्यानंतर शहादा येथील स्टेट बँक चौकात असलेल्या कृषी भवन परिसरात भारतीय जनता पक्षाचे वतीने फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी पालिकेचे गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष विजूआण्णा पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक के.डी.पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, संजय चौधरी, दिनेश खंडेलवाल, विनोद जैन, एकनाथ नाईक, अनिल भामरे, कल्पेश पटेल, सुनिल पाटील, मोतीशेठ जैन,ललीत छाजेड,हितेंद्र वर्मा, रमाशंकर माळी,प्रा.भरत देसले, कमलेश जांगिड,
नितीन कोळी, गोपाळ गांगुर्डे, प्रदीप ठाकरे, कार्तिक नाईक,सागर मराठे, योगेश डामरे, नितीन तिरमले, हरीष पाटील, नितीन ठाकरे,किरण ठाकरे, विपूल चौधरी, गोपाळ गिरासे, बाबा पानपाटील, विशाल मोरे, जयेश पाटील, गणेश पाटील आदिंची उपस्थिती होती.