नंदुरबार l प्रतिनिधी
सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडीओ प्रसारित करणार्या इसमाला अक्कलकुवा पोलीसांकडून तात्काळ अटक करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरुन काही लोक दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट , लेख लिहुन जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न करतात म्हणून सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवावे व कोणतीही पोस्ट सोशल मीडियावरून प्रसारीत करतांना ती पोस्ट आक्षेपार्ह आहे अगर कसे ?
याबाबत खात्री करुन मगच ती प्रसारित करण्याची काळजी घ्यावी . आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणान्या इसमाविरुध्द भारतीय दंड संहिता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील तसेच सायबर सेल यांच्याकडून वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात आले होते .
तरी देखील दि.२८ जून रोजी रात्री ८ वा . सुमारास अक्कलकुवा शहरात राहणारा महेश परमसुख तंवर नावाच्या व्यक्तीने एका व्हॉट्सअप गृपवर धार्मीक भावना भडकतील व असंतोष निर्माण होईल . तसेच दोन धर्मात तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा आक्षेपार्ह व्हीडीओ प्रसारीत केला असलेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली .
काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा शहरातच सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे दोन धर्मात तणाव निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने वेळीच कठोर पाऊले उचलल्यामुळे परिस्थिती चांगल्या रितीने हाताळली गेली .
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांना सांगून संबंधीत इसमावर कठोर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले .
त्याप्रमाणे अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी तात्काळ संशयीत इसम महेश परमसुख तंवर याचा शोध घेतला असता तो मिळून आला . त्याच्याविरुध्द् अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ५०५ ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर गुन्ह्यामध्ये संशयीत आरोपी महेश परमसुख तंवर यास अटक करण्यात आली आहे .
फेसबुक , इंस्टाग्राम , व्हॉट्सऍप , ट्विटर व इतर सोशल मीडियावर धार्मीक भावना भडकविणार्या दोन धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडीओ , किंवा पोस्ट प्रसारित करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नये . जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तींनी आक्षेपार्ह पोस्ट ठेवून कायदा हातात घेवू नये नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सोशल मिडीयावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन लक्ष ठेवले जात आहे . कोणीही कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही असे आवाहन पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले आहे .