नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील शनिमांडळ येथील प्रसाद संजय पाटील यांची आर्यलँड येथील युनिर्व्हसिटी कॉलेज ऑफ क्राक सिटी येथे सहाय्यक शास्त्रज्ञ आणि रिसर्च प्रोग्रॅमर या पदावर निवड झाली आहे.
प्रसाद पाटील यांनी पुणे येथील डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठातून बी.टेक(मायक्रो नॅनो टेक्नॉलॉजी) यात प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केल्यानंतर पुढील शिक्षण एम.एस.साठी आर्यलँड येथील युनिर्व्हसिटी कॉलेज डबलीन येथे निवड झाली. तिथून त्यांनी एम.एस.(मायक्रो नॅनो टेक्नालॉजी) विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केल्यानंतर
आयरिश सरकारने त्यांची युनिर्व्हसिटी कॉलेज ऑफ क्राक सिटी येथे सहाय्यक शास्त्रज्ञ या पदावर नियुक्ती केली आहे.त्यांची सहाय्यक शास्त्रज्ञपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.प्रसाद पाटील हे शनिमांडळ येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव दयाराम पाटील यांचे नातू व टोकरतलाव येथील जि.प.शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक संजय पाटील यांचे पुत्र आहेत.
त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण श्रॉफ हायस्कूल येथे झाले आहे. प्रसाद पाटील यांनी सातपुड्यातील आदिवासी जीवनमानावर शोधप्रंबंध सादर केला होता.दरम्यान,ग्रामीण भागातील युवकाने शास्त्रज्ञ पदापर्यंत मजल मारल्याने त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.








