नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावातील शेतकरी अमृत यादवराव पाटील हे सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात जात होते सकाळी 8 वाजता गेले आणि त्यांनी त्यांची गाडी (क्र. -एम.एच.३९.एच.९३०६) मोटारसायकल झाडाखाली उभी करून तेही खाटेवर बसले असता त्यांच्या पाठीमागून चक्क कोब्रा नाग येताना त्यांनी पाहिला आणि त्यांनी हालचाल न करता त्या सापावर लक्ष ठेवले असता तो मोटारसायकलच्या सीटखाली घूसतांना त्यांनीं पाहिला.
त्यानंतर त्यांनी आजूबाजूला असलेल्या शेतकरी बांधवांना बोलावून याबाबत सांगितले त्यानंतर जूनमोहिदे गावातील सर्पमित्रला पवन पाटील यांना बोलावून या कोब्रा नागाला पकडून सुरक्षित जागी सोडण्यात आले.
हा गोब्रा साप आजूबाजूच्या शेजारी असलेल्या शेतकरी बलराज पाटील, मुकेश पाटील, रघुनाथ पाटील, गणेश पाटील यांनाही वारंवार दिसून येत असल्याने आणि अमृत पाटील या शेतकरी बांधवांच्या सावधानतेने अनर्थ टाळता आला.
शेतकरी बांधवांना आता पावसाळा सुरू झाला आहे खरिप हंगामाला सुरूवात झाल्याने आपल्या शेतात सावधानतेने काम करावे व स्टार्टर पेटी, मोटारसायकल, झोपडीत आदी ठिकाणी साफसफाई ठेवावी व सावध राहावे असे अमृत पाटील यांनी केले.