नंदुरबार l प्रतिनिधी
आज तापी नदी पात्रात पाऊस झाल्याने सुलवाडे बॅरेजची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली असून सुलवाडे बॅरेज मधून तापी नदी पात्रात पाणी प्रवाह सोडण्यात येणार असून पुढील 4 ते 8 तासांमध्ये सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज प्रकल्पातून पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता तापी नदी पात्रात पाणी प्रवाह सोडण्यात येईल.
तरी तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, याबाबत आवश्यक खबरदारी म्हणून गावांत दवंडीद्वारे नागरिकांना सूचना द्यावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.