Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे व्वा हा तर खानदेशचा सन्मान : बटरफ्लाय’ला आंतराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट लघू चित्रपट ॲवार्ड, तसेच अन्य तीन ॲवार्ड घोषीत

team by team
June 24, 2022
in राष्ट्रीय
0
अरे व्वा हा तर खानदेशचा सन्मान : बटरफ्लाय’ला आंतराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट लघू चित्रपट ॲवार्ड, तसेच अन्य तीन ॲवार्ड घोषीत

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील बाल रोगतज्ज्ञ डॉ.सुजित पाटील यांनी दिग्दर्शन केलेल्या “बटरफ्लाय ‘या लघू हिंदी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय शोर्ट फिल्म महोत्सवात उत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा ॲवार्ड पश्चिम  बंगालच्या फेस्टीवलमध्ये जाहीर  झाला असून  विन्टेज रील्स फिल्म फेस्टीवलमध्येही तीन ॲवार्ड एकटया “बटरफ्लाय’ला घोषीत झाल्याची माहिती निर्माते डॉ. राजकुमार पाटील यांनी दिली.

नंदूरबार शहरातील डॉक्टर व कलाकारांचा सहभाग असलेला बटरफ्लाय हा लघुचित्रपट नंदुरबार शहरात २९ मे रोजी दाखविण्यात आला होता. त्यावेळेस या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

आता या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात बेस्ट शॉर्ट फिल्म चा अवार्ड मिळवून आम्हाला सुखद धक्का दिला आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम अशी भुमिका वठवली असल्याचे मत डॉ.राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

तसेच या लघूचित्रपटाला बेस्ट युथ डायरेक्टर ,बेस्ट डायलॉग, बेस्ट मेन्शन ॲवार्ड असे तीन वेगळे ॲवार्ड  वीन्टेज रील्स फिल्म् फेस्टीवलमध्ये जाहीर करण्यात आले आहेत.

रणजितसिंग राजपूत, डॉ.राजकुमार पाटील, डॉ. वृषाली पाटील,पुनम भावसार,  डॉ.राजेश कोळी,डॉ. प्रकाश ठाकरे, दिलीप सोनार, दिलीप सोनार, प्रशंसा तवर, कामिनी भोपे,डॉ जयंत शाह,संदीप सुर्यवंशी, अनिता वसावे,नंदा सोनार,रविंद्र पोतदार,डॉ.स्वप्नील जैन,नागसेन पेंढारकर,डॉ.अनिकेत नागोटे आदींच्या महत्वपूर्ण  भुमिका आहेत.

डॉ.सुजित पाटील यांनी आता पर्यंत पाच शॉर्ट फिल्म बनवल्या असून जवळपास सर्वच लघू चित्रपटांना ॲवार्ड मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव भरवून त्यांनी नंदुरबारच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.

आता तर त्यांचे लघूचित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजत  आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय लघूचित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून देखील काम केले आहे. नंदुरबारच्या लघूचित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲवार्ड घोषीत झाल्याने आमच्या टीमला खुप आनंद झाला आहे. ही केवळ आमच्यासाठीच नव्हे तर खानदेशासाठी अभिमानाची गोष्ट आहे,असे डॉ राजकुमार पाटील यांनी सांगितले.

कथा डॉ सुजित पाटील यांचीच असून मानसिंग राजपूत, सारजन शेट्टी, मयूर सुर्यवंशी यांनी कॅमेरामन म्हणून उत्तम न्याय दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रवासी वाहन ५० फूट खोल दरीत कोसळले, एक ठार, सहा जखमी

Next Post

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर

Next Post
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add