Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रवासी वाहन ५० फूट खोल दरीत कोसळले, एक ठार, सहा जखमी

team by team
June 24, 2022
in क्राईम
0
प्रवासी वाहन ५० फूट खोल दरीत कोसळले, एक ठार, सहा जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील गोरंबा पाटीलपाडा येथे खराब रस्त्यामुळे प्रवासी प्रवासी वाहन ५० फूट खोल दरीत पडून झालेल्या अपघातात १ जण जागीच ठार तर ६ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोरंबा पाटीलपाडा येथे खराब रस्त्यामुळे प्रवासी वाहन उतारावरून घसरून थेट ५० फूट खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे.

या अपघातात मानसिंग वळवी (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले आहे. जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून चार जण गंभीर जखमी आहे. सर्व प्रवासी सेगलापाडा येथील रहिवासी होते.


सदर वाहन किर्ता कागडा रहासे यांचे असून गोरंबाच्या सेगलापाडा येथील प्रवाशांना शहादा येथे बाजारासाठी घेऊन आले होते, घरी परत जात असताना गोरंबा पाटीलपाडा जवळ हलक्या पावसाच्या सरी कोसळत असताना तीव्र उतारावरून प्रवासी वाहन घसरल्याने थेट ५० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. सदर रस्त्यावर अद्यापही शासनाकडून डांबरीकरण रस्त्याचे काम केलेले नाही.

स्थानिक नागरिकांकडून माती टाकून कच्चा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर पाड्याला जोडणार्‍या रस्त्यांचे काम तात्काळ करावी अशी मागणी नागरिकांद्वारे केली जात आहे.

सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव अक्कलकुवा तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या नावाने तयार होणार्‍या रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. डोंगरदर्‍यातील चढ-उतार खडतर रस्त्यांमुळे बस सुविधा नसल्याने या भागातील नागरिकांना खाजगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.

वर्षानुवर्षे खराब रस्त्यांमुळे वारंवार दरीमध्ये प्रवासी वाहने पडुन अपघातांचे सत्र सुरूच आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यावर ठोस उपाय योजना करण्यास तयार नाही.

ग्रुप ग्रामपंचायत गोरंबा मुख्य पाड्याला जोडणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण काम २००८ साली करण्यात आले होते. गेल्या १४ वर्षानंतर या रस्त्यावर कोणतीही दुरुस्ती किंवा नवीन रस्ता तयार करण्यात आलेला नाही.

त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वारंवार अपघात घडत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चाकुने गळा चिरुन पत्नीला जिवे ठार मारणाऱ्या पतीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, या कारणामुळे केला खून

Next Post

अरे व्वा हा तर खानदेशचा सन्मान : बटरफ्लाय’ला आंतराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट लघू चित्रपट ॲवार्ड, तसेच अन्य तीन ॲवार्ड घोषीत

Next Post
अरे व्वा हा तर खानदेशचा सन्मान : बटरफ्लाय’ला आंतराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट लघू चित्रपट ॲवार्ड, तसेच अन्य तीन ॲवार्ड घोषीत

अरे व्वा हा तर खानदेशचा सन्मान : बटरफ्लाय'ला आंतराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट लघू चित्रपट ॲवार्ड, तसेच अन्य तीन ॲवार्ड घोषीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add