Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चाकुने गळा चिरुन पत्नीला जिवे ठार मारणाऱ्या पतीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, या कारणामुळे केला खून

team by team
June 24, 2022
in क्राईम
0
विद्यार्थी, तरुणांची अडचण लक्षात घेऊन 21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीतील कोरोनाविषयक खटले मागे

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार येथे चाकुने गळा चिरुन पत्नीला जिवे ठार मारणाऱ्या पतीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरूण सुकलाल नामदास व त्याची पत्नीरेखा अरूण नामदास हे दाम्पत्य नंदुरबार शहरातील तुलशी विहार कॉलनी प्लॉट क्र . 22 येथे राहत होते . दि . 21 जून रोजी रात्री ते दि. 22 जून रोजी 10.30 वाजे दरम्यान दोन्ही पती पत्नी यांच्यात कौटुंबीक कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात पती अरूण सुकलाल नामदास याने त्याची पत्नी रेखा अरूण नामदास हिचा चाकुने गळा चिरुन तेथून पळून गेला .

रेखा अरूण नामदास यांना शेजारच्या व्यक्तींनी रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच डॉक्टरांनी रेखा नामदास यांना मृत घोषीत केले होते . म्हणून अरूण सुकलाल नामदास याचेविरुध्द् उपनगर पोलीस ताब्यात भादंवि कलम 302 प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर होता . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधीकारी , नंदुरबार सचिन हिरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील व अमंलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले .

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व उपनगर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे पथक तयार करुन आरोपी तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले .

संशयीत आरोपी अरूण सुकलाल नामदास हा सिंधी कॉलनी येथील तमन्ना सुपर शॉपी नावाच्या दुकानात काम करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली . त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना पथकासह तमन्ना सुपर शॉपी येथे रवाना करुन संशयीत आरोपी अरुण नामदास याच्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सांगितले .

दुकान मालक व दुकानात काम करणारे इतर कामगार यांच्याकडून गुन्ह्यातील संशयीत आरोपीताचा फोटो व मोबाईल क्रमांक प्राप्त केला . तसेच थोड्या वेळापुर्वी अरुण नामदास हा दुकानावर आला होता व दुकान मालक यांच्याकडून 500 रुपये घेवून गेल्याची प्राथमीक माहिती मिळाली .

अरुण नामदास हा 500 रुपये घेवून कोठे जावू शकतो याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमंलदार चर्चा करीत असतांना , नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना एका गोपनीय बातमीदारामार्फत खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी हा त्याचे मुळ गाव अमळनेर जि . जळगांव येथे धुळे मार्गे एका बसने जात असल्याबाबत समजले .

म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार बस स्थानक येथे जावून धुळ्याला जाणान्या बस व खाजगी वाहनांची माहिती घेतली असता थोड्याच वेळापूर्वी धुळ्याला एक बस गेल्याची माहिती मिळाली . म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास तातडीने धुळ्याकडे रवाना केले .

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धुळे येथील बस स्टँड येथे पोहोचल्यावर नंदुरबार येथून एक बस काही वेळापूर्वीच आल्याची माहिती मिळाली . त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बस स्टँड लगतच्या जे.बी. रोड , टेलीफोन एक्सचेंज , बारा पत्थर , जेल रोड व बस स्थानक परीसरात संशयीताचा शोध घेत असतांना संशयीत आरोपी हा बस स्थानकाच्या बाजुला असलेल्या टॅक्सी स्टँडजवळ अमळनेर येथे जाणाऱ्या गाडीजवळ उभा असल्याचे दिसून आले .

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी त्यास ओळखून टॅक्सी स्टँडच्या आजुबाजुला सापळा रचला . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या दिशेन येत असल्याचे संशयित आरोपी अरुण नामदास यास चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढला परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अरुण नामदास यास शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले .

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला म्हणून अरुण नामदास यास नंदुरबार येथे आणले . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी संशयीतास अत्यंत कौशल्यपूर्वक विचारपुस करुन संशयीताच्या त्याच्या विसंगत बाबी निदर्शनास आणून दिल्या व संशयीत आरोपी अरूण सुकलाल नामदास यास बोलते केले व त्याने खून केल्याचे कबुली केले तसेच घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली .

ताब्यात घेण्यात आलेला संशयीत आरोपी अरूण सुकलाल नामदास याने माहिती सांगितली की , मयत रेखाबाई अरुण नामदास यांच्यात दि 21 जून रोजी रात्री मयत रेखा हिचा मोबाईल हातात घेण्यावरून कौटूंबीक वाद झाला होता व रागाच्या भरात अरुण नामदास याने त्याची पत्नी मयत रेखाबाई नामदास हिचा धारदार चाकुने गळा चिरून जिवे ठार केले बाबत माहिती दिली .

अरूण सुकलाल नामदास यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे .

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक , नंदुरबार विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी , नंदुरबार हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार महेंद्र नगराळे , पोलीस अमंलदार आनंदा मराठे , मंगलेश वसईकर यांच्या पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

मजूरीचे काम पूर्ण केले नाही म्हणून दोघांना मारहाण

Next Post

प्रवासी वाहन ५० फूट खोल दरीत कोसळले, एक ठार, सहा जखमी

Next Post
प्रवासी वाहन ५० फूट खोल दरीत कोसळले, एक ठार, सहा जखमी

प्रवासी वाहन ५० फूट खोल दरीत कोसळले, एक ठार, सहा जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add