नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील सेनेचा एक आक्रमक आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेले आमश्या फुलजी पाडवी यांना राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीत 2600 मतमूल्य मिळाल्याने ते विजयी झाले.
नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचा पहिला आमदार म्हणून त्यांची नोंद झाली. त्यांच्या निवडीबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच मुंबई येथील विधान परिषदेच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावत निवडीबद्दल प्रचंड जल्लोष साजरा केला.
विधानपरिषद निवडणूक निकाल
राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवारांना जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमूल्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी फेरीनिहाय मिळालेले मतमूल्य पुढीलप्रमाणे :
पहिल्या फेरीअखेर राम शिंदे (भाजपा) यांना 3000, श्रीकांत भारतीय (भाजपा) यांना 3000, एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2900, प्रवीण दरेकर (भाजपा) यांना 2900, रामराजे नाईक निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 2700, श्रीमती उमा खापरे (भाजपा) यांना 2700, सचिन अहिर (शिवसेना) यांना 2600 आणि आमश्या पाडवी (शिवसेना) यांना 2600 तर पाचव्या फेरीअखेर प्रसाद लाड (भाजपा) यांना 2857 इतके मतमूल्य मिळून त्यांनी विजयासाठीचा कोटा पूर्ण केला.
दहाव्या व शेवटच्या फेरीअखेर भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2474 इतकी मतमूल्य तर चंद्रकांत हंडोरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांना 2200 इतकी मतमूल्य मिळाली. या फेरीअखेर अधिक मतमूल्यांच्या आधारे श्री.जगताप हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले.
विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी विजय प्राप्त केला. शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उमेदवारीसाठी स्पर्धेत असताना आमश्या फुलजी पाडवी यांनी बाजी मारली.
नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील सेनेचा एक आक्रमक आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेले आमश्या पाडवी यांच्या नावावर शिवसेना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार होते.आमश्या पाडवी यांना राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीत 2600 मतमूल्य मिळाल्याने ते विजयी झाले.नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचा पहिला आमदार बनण्याचा मान त्यांनी मिळविला.
आमश्या पाडवी हे नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. मागील ३० वर्षांपासून ते अक्कलकुवा भागात कार्यरत असून त्यांनी पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली आहे. पाडवी हे अक्कलकुवा पंचायत समिती माजी सभापती होते. आमश्या पाडवी हे सेनेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. शिवसेनेला नंदुरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केल्याचं बोललं जातं.
अक्कलकुवा हा अत्यंत दुर्गम भाग असून कोणतीही साधनं नसतानाही पाडवी यांनी या भागात शिवसेना रुजवण्याचं काम केलं आहे.त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र राज्याच्या राजकारण दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲड. के. सी. पाडवी यांना त्यांनी कडवी झुंज दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी यांनी ८० हजार ७७७ मते घेतली होती.
दरम्यान, नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या काळापासून नंदुरबारमधून काँग्रेसच्या राज्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात होते. त्यामुळे या जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाडवी यांना शिवसेनेने विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात असे असेल तरी शिवसेनेने एका सच्चा व निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय दिला आहे.
त्यांच्या निवडीबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच मुंबई येथील विधान परिषदेच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावत निवडीबद्दल प्रचंड जल्लोष साजरा केला.
आमश्या पाडवी यांचा असा आहे राजकीय प्रवास
सन १९९३ मध्ये ब्रिटीश मेवारा अंकुशविहिर येथे ग्रुप ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्य , सन १ ९९ ६ मध्ये ब्रिटीश मेवास अंकुश विहिरचे सरपंच , सन २००१ ते २००८ पर्यंत भाजपातर्फ अक्कलकुवा पंचायत समितीत सभापती , सन २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश प्रवेशानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी , सन २०१४ मध्ये धडगाव- अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढविली . तिसऱ्या क्रमांकावर राहिले . २०१५ मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी , सन २०१ ९ मध्ये दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर १२०० मतांनी पराभव . जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक , २० जून २०२२ रोजी विधान परिषदेवर विजयी .