नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटी परिसरात टेकडीवर असलेल्या श्री काशिनाथ बाबा मंदिरावर तब्बल 51 वर्षांनंतर वीज पोहोचली. नंदुरबार नगर पालिकेतर्फे मंदिराजवळ सुमारे वीस फूट उंचीचा सौर ऊर्जा निर्मित हायमसट लॅम्प बसविण्यात आला.
गवळी समाजासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणार्या काशिनाथ बाबा मंदिराची निर्मिती 1970 मध्ये झाली होती. मात्र अनेक वर्षांपासून सदर मंदिर विजेपासून वंचित होते. अखेर नंदुरबार नगर पालिकेतर्फे काशिनाथ बाबा मंदिरावर सौर दिवा उभारण्यात आला.
याबद्दल श्री काशिनाथ बाबा सेवा समितीतर्फे उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, नगरसेवक किरण रघुवंशी, नगरसेवक दीपक दिघे यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानण्यात आले.
मंदिरावर सौर दिवा लागल्याबद्दल रविवारी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भावना व नंदलाल यादबोले या नवदांपत्यास पूजेचा मान देण्यात आला.
पौरोहित्य किशोर जोशी महाराज यांनी केले. यावेळी श्री काशिनाथ बाबा सेवा समितीचे संचालक महादू हिरणवाळे, पत्रकार मनोज शेलार, प्रशांत पाटील,पांडुरंग यादबोले, संभाजी हिरणवाळे,
विष्णू यादबोले,अशोक यादबोले, रनाळे जि. प. शाळेचे शिक्षक अमृत पाटील ,गोटू पाटील, सुनिल लगडे, गणेश यादबोले, अश्विन नागापुरे, शकुंतला यादबोले, अनिल यादबोले, मनोज गवळी, रूसतम पाडवी तसेच ज्ञानदीप सोसायटी व गवळीवाडा परिसरातील भाविक उपस्थित होते.








