नंदूरबार l प्रतिनिधी
आज दि.17 जून रोजी पुर्णा नदीची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली असून हतनूर धरणातून पुढील 4 ते 8 तासांमध्ये तापी नदी पात्रात हतनूर धरणांमधून पाणी प्रवाह सोडण्यात येऊ शकतो.
हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये याकरिता प्रत्येक गावात दवंडी द्वारे सूचना देण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी केले आहे.
आज दि. 17 जून रोजी दुपारी बारा वाजता हतनूर धरणाचे चार दरवाजे 0.50 मीटरने उघडून तापी नदी पात्रात 3955 क्युसेक्स वेगाने पाणी प्रवाह सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाने कळविले आहेत.








