शहादा l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोरगरीब दलित- वंचित घटकांच्या विकासासाठी सदैव पाठीशी उभा राहिला आहे विविध कल्याणकारी योजनांतुन त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे असे स्पष्ट करीत,
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने आर.आर. पाटील सुंदर गाव योजना आणि कृषी आरोग्य दळणवळण या क्षेत्रातून राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रभावीपणे प्रयत्न करीत असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी शहादा येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे सर्वात क्षेत्रात होत असलेले मजबूत संघटन व महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राबवित असलेले विविध कल्याणकारी योजनांची माहित डॉ.अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी जोशी, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, तालुका अध्यक्ष माधव पाटील, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंदारे ,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दानिश पठाण ,सरचिटणीस मधुकर पाटील, युवक तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर ,छोटू कुवर, संतोष पराडके, अलका जोंधळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना डॉ.मोरे म्हणाले शासनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने 6 जून रोजी राज्यात शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे उपक्रम सुरू केला महिला व बालकांना अत्याचारापासून संरक्षण देणाऱ्या शक्ती कायद्याचे विधेयक मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादीने महत्वाची भूमिका बजावली कोरोना काळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही.
यासाठी प्रयत्न सुरू केलेत राज्यातील सुमारे पाच हजार लोक कलावंतांना आर्थिक मदतीचा हात दिला चीपळून परिसरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन त्यांना आधार दिला यासोबतच राष्ट्रवादी जिवलग उपक्रम राबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादूता मार्फत कोरोना संसर्गामुळे पालकत्व हरवलेल्या बालकांना मदतीचा हात देऊन त्यांचे भविष्य घडविण्याचा अभिनव उपक्रमही राष्ट्रवादी काँग्रेस राबवित आहे.
शासनात राहून राज्यभरात जल जीवन मिशन प्रभावीपणे राबवितांना सुमारे 10 हजार पाणीपुरवठा योजना सुरू केल्या जात आहेत त्यात काही योजना प्रगतीपथावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच कार्यरत असल्याचेही डॉ. अभिजित मोरे म्हणाले.
उपसासिंचन योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू
जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना बाबत बोलताना डॉ.अभिजित मोरे म्हणाले की राज्यातील जलसंपदामंत्री व पक्षाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी 115 कोटी रुपयांची तरतूद केली आहे यास लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून उपसा सिंचन योजनांचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आम्ही पाठपुरावा करीत आहोत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता उपसा सिंचन योजना लवकर कार्यान्वित व्हाव्यात यासाठी मी व्यक्तिशः पाठपुरावा करीत असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले
पालिका निवडणूक आघाडीसाठी सकारात्मक अन्यथा..
पक्ष संघटन बाबत बोलताना डॉ. मोरे म्हणाले आमचे नेते शरद पवार ,सुप्रियाताई सुळे ,अजित पवार व जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात संघटन वाढत आहे मात्र जिल्यात व्यक्तिकेंद्रित संघटनेला माझा विरोध असून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर केली जाते शहादा पालिका निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले आम्ही आघाडीसाठी सकारात्मक असून अन्य दोन्ही पक्षांची भूमिकाही महत्वाची आहे अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढण्यास सज्ज आहे.