नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील एका मशिदीजवळून व शहादा शहरातील एका हॉस्पिटलजवळून अशा दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर येथील शेख तस्लीम शेख अलीम पटवे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एम ०६५७) नवापूर शहरातील एका मशिदीजवळून चोरट्याने लंपास केली.
याबाबत शेख तस्लीम शेख अलीम पटवे यांच्या फिर्यादीरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोहेकॉ.दादाभाऊ वाघ करीत आहेत. तसेच शहादा येथील शेख आरीफ उस्मान मन्यार यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ आर ५७१३) शहादा शहरातील एका हॉस्पिटलजवळून चोरट्याने लंपास केली.
याबाबत शेख आरीफ उस्मान मन्यार यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.किरण पावरा करीत आहेत.