नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा रविदास समाज उन्नती मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. जिल्हा रविदास समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश मलखेडे उपाध्यक्षपदी बापू ठाकरे तर सचिवपदी विनोद अहिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नंदुरबार येथील दंडपाणेश्वर मंदिरात नंदुरबार जिल्हा रविदास समाज उन्नती मंडळाची सभा घेण्यात आली. यावेळी संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली.
याप्रसंगी दगडू अजिंठे, राजेंद्र पवार, युवराज पवार, रमेश मलखेडे, बापू ठाकरे, अनिल अहिरे, ईश्वर सोनवणे, विनोद अहिरे महेंद्र चव्हाण, प्रदिप अहिरे, धनराज अहिरे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी समाजाच्या विविध विषयांवर चर्चा करून मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यावर विचारविनिमय करण्यात आले. तसेच मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी रमेश मलखेडे उपाध्यक्ष बापू ठाकरे, सचिव विनोद अहिरे,
प्रसिद्धी प्रमुखपदी धनराज अहिरे, ज्येष्ठ सल्लागार म्हणून दगडू अजिंठे, राजेंद्र पवार, युवराज पवार, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.