नवापूर l प्रतिनिधी
शहरातील बेलदारवाडा भागात नगर पालिकेने नवीन सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम स्थगित न केल्याने दिव्यांग महिला प्रमिला गावित आणि पुनम बिऱ्हाडे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आज पाचवा दिवस उजाडला तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही.
उपोषणाचा काहीही उपयोग होत नसल्याने नगरपालिकेच्या माध्यमातून उचित कारवाई न झाल्यामुळे भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी बेलदार वाड्यातील उपोषणास बसलेल्या दिव्यांग महिला यांच्या दोन तास ठिय्या आंदोलन तहसीलदार याचा दालनात सुरू केले.जो पर्यत न्याय मिळत तो पर्यत आंदोलन सुरूच ठेवा असा पवित्रा घेतला.
दरम्यान तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी मुख्याधिकारी यांना फोन केला, मात्र नगर पालिका मुख्याधिकारी याना तहसील कार्यालयात येण्यासाठी 1 तास लागला. मुख्यधिकारी यांना तहसीलदार यांनी फोन करुन ही तहसील कार्यालयात येण्यासाठी 1 तास लागतो त्यांना जनतेची काय पर्वा नाही असा आरोप भाजपाने केला .
दोन तासानंतर तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करून या बाबत चर्चा केली असता प्रांताधिकारी यांनी उद्या दि १४ जुन २०२२ नवापूर ला येऊन या विषयाचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्या नंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावित,अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,नगरसेवक महेंद्र दुसाने, जयंतीलाल अग्रवाल ,जितेंद्र अहिरे ,प्रणव सोनार, दुर्गा वसावे, रमला राणा, कृणाल दुसाने, हेमंत शर्मा ,सुनील पवार ,जैनु गावित,के टी गावीत बेलदार वाड्यातील महिला उपस्थित होत्या.