तळोदा | प्रतिनिधी
भवरकडून खर्डी नदी मार्गे तळोदाकडे दुचाकीवरून येणार्या कळमसर मोहिदा येथील ४० वर्षीय इसमाचा अंगावर झाड उन्मळुन पडल्याची घटना घडली, दरम्यान उपचारा दरम्यान त्यांचा रात्री मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोद्यात दि.११ जून पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वार्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वार्याचा जोर इतका होता की, रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. दुचाकीवरून
भवरकडून खर्डीनदी मार्गे तळोदाकडे येणार्या रवींद्र गुलाब ठाकरे (वय ४०) रा. कळमसर मोहिदा हा कामे आटपून तळोदाकडे येत असताना अचानक त्याच्या दुचाकीवर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत चालक झाडाखाली अडकून पडला होता.
दरम्यान झाड कोसळल्याचा आवाज झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. रस्त्यावर जाणारे प्रवासी व जवळच असलेले धाणकावाडा येथील नागरिकांची धावपळ केली. झाडाखाली सापडलेले दुचाकीवरून त्यांना बाजूला काढले व त्यास रुग्णवाहिकेला प्राचारण करून तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. दरम्यान उपचारा दरम्यान रवींद्र गुलाब ठाकरे यांचा रात्री मृत्यू झाला.