नंदुरबार l प्रतिनिधी
अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष मंगेश सोनवणे यांच्या पाठपुराव्याला शहाद्याचे तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी प्रतिसाद देत शहादा तालुक्यातील प्रकाशा या गावातील १६ दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मंजुर करून दिले.
१६ दिव्यांग लाभार्थ्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष मंगेश सोनवणे, जिल्हा अध्यक्ष महिला संगीताताई भोई, जिल्हा सचिव अर्जुन पाडवी, सचिन जाधव यांच्यासह दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.