नंदूरबार l प्रतिनिधी
आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस ठेवण्याच्या वादातुन अक्कलकुवा येथे काल रात्री तुफान दगडफेक करण्यात आली असून, दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा येथे आक्षेपार्ह व्हॉटसप स्टेटस ठेवण्याच्या वादातुन
काल रात्री १२ वाजेनंतर तुफान दगडफेक करण्यात आली. पोलीस स्टेशन मधुन परतत असतांना काही जणांनी केलेल्या दगडफेकीनंतर वातावरण चिघळले.
झेंडा चौक, बाजार पेठ, तळोदा नाका, मरीमता मंदिर परिसरात मोठे नुकसान झाले असून
दुचाकीसह, चार चाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अक्कलकुवा शहरात सध्या तणावपुर्ण शांतता असून पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी अक्कलकुव्यात दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनाकडून आरोपींचा शोध सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.