नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव ते शहादा रस्त्यावरील उदय नदीच्या पुलावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील रोषमाळ बु.चा मानसिंगपाडा येथील उदयसिंग मानसिंग पावरा हे दुचाकीने (क्र.एम.एच.१८ बीटी ६६०९) शहादा ते धडगाव रस्त्याने जात होते.
यावेळी एका लाल रंगाच्या ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात उदय नदीच्या पुलावर दुचाकीला धडक दिल्याने यात उदयसिंग पावरा ठार झाले.
तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत दिलवरसिंग उदयसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल भदाणे करीत आहेत.