नंदुरबार l प्रतिनिधी
वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा ४८२ व्या जयंतीनिमित्ताने हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळ्याला दुधाभिषेक, पूजन, महाआरती, शंखनाद करून कृतज्ञता सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात श्लोक आणि घोषणेने करण्यात आली. वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळ्याचे दुधाभिषेक राजपूत समाजाचे अशोक वेडू राजपूत यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ यांनी केले.
माल्यार्पण आणि महाआरती दिलीपसिंग गिरासे यांनी केली. यावेळी हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी महाराणा प्रतापसिंह यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सर्वांना संघटित होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमातला विलास राजपूत,रविंद्र राऊळ,भिमसिंग राजपूत,चेतनसिंग राजपूत, बाबासाहेब राजपूत, ॲड. अनिल लोढा , ॲड. अविनाश पाटील, ॲड. रोहन गिरासे डी.व्ही.राजपूत राजेश राजपूत , मोहन जैन संजयसिंग सिसोदिया, सुमानसिंग राजपूत,चेतन राजपूत,वामन राजपूत, हेमंतसिंग राजपूत, रत्नदीप राजपूत,
पंकज राजपूत, अर्जुन मराठे , नरेंद्र माळी, मुकेश राणा, मुकेश राजपूत, उमेश राजपूत,पवन राजपूत, दिपक राजपूत, सुदर्शन राजपूत, दिपक राणा, सुनील राजपूत, बापू महाले, हेमंत राजपूत, अभिषेक राजपूत, विशाल राजपूत , कल्याणसिंह राजपूत, राहुल राजपूत, राकेश राजपूत, रणजितसिंह राजपूत,अंबालाल राजपूत,
योगेश राजपूत, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, पंकज डाबी, सुयोग सुर्यवंशी, विशाल सावळे माळी, जितेंद्र मराठे, गौरव धामणेसह राजपूत समाज तथा विविध संघटनेचे प्रतिनिधी, अधिवक्ता, हिंदुत्ववादी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक आणि क्षत्रिय राणा राजपूत सेवा समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.