नंदुरबार l प्रतिनिधी
वीर शिरोमणी, हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त महाराणा प्रताप युवक मंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे गुरुवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबार येथील राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज लक्ष्मण राजपूत व शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र गिरासे यांच्या हस्ते बस स्थानक परिसरातील महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थित समाजबांधवांनी महाराणा प्रताप की जय, राणा की जय जय शिवा की जय जय अशा घोषणा दिल्या. यावेळी राजपूत समाजाध्यक्ष मोहनीराज राजपूत,उत्सव समिती अध्यक्ष उपेंद्र राजपूत, उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.