Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रविवारी कुंडल येथे सातपुडा आदिवासी महापंचायत

team by team
June 3, 2022
in सामाजिक
0
रविवारी कुंडल येथे सातपुडा आदिवासी महापंचायत

नंदुरबार l प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुंडल (ता.धडगाव) दि.५ जून रोजी आदिवासी एकता परिषद व कुंडल गाव समितीतर्फे सातपुडा आदिवासी महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. या पंचायतीत ‘निसर्ग व आदिवासी या दोन्ही घटकांमधील नाते’ यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

आदिवासी जीवन पद्धती व संस्कृतीची निसर्गाशी नाळ जुळते. निसर्गाशिवाय आदिवासी संस्कृतीची फारशी कल्पनाच करता येत नाही तर निसर्ग वाचविण्याची ताकद केवळ आदिवासी जीवनपद्धतीतच आहे, म्हणून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही महापंचायत होत आहे.

या पंचायतीत परक्या संस्कृतीच्या आघाताने आदिवासी संस्कृतीचा ऱ्हास, प्रगत मानवी जीवनमुल्यांना निर्माण झालेला धोका, बऱ्याच वेळा नानाविध नावे ठेवत, हिणवत आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता व स्वाभिमान यावर बोट ठेवण्याची प्रथा, स्थलांतर व स्थलांतरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, परक्या जातीत आदिवासी मुला-मुलींचे होणारे लग्न व उद्भवणाऱ्या समस्या, सातपुड्यातील दहेजची वाढती रक्कम व निर्माण होणारे धोके. या विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे.

या पंचायतीतआदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोकभाई चौधरी, आदिवासी विचारवंत तथा चळवळकर्ते सांगल्याभाई वळवी, व्याराचे माजी खासदार अमरसिंगभाई चौधरी, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत,

एकता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डोंगरभाऊ बागुल, डॉ.सुनिल पऱ्हाड (पालघर), राजू पांढरा, माजी जि.प.उपाध्यक्ष सुहास नटावदकर, जि.प.कल्याण सभापती रतनदादा पाडवी, जि.प.चे गटनेते सी.के.पाडवी, सेवानिवृत्त अभियंता जेलसिंग पावरा, करमसिंग पाडवी,ॲड.अभिजित वसावे आदी उपस्थित राहणार आहेत.

महापंचायतीला संपूर्ण जिल्ह्यातून आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन योगेश पाडवी, रवींद्र पाडवी, गणेश पाडवी, कल्पेश पाडवी, चंद्रसिंग पाडवी, राकेश वळवी, सारपा पाडवी, मांगीलाल पाडवी राकेश पाडवी व विनोद पाडवी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील २१ पोलीस अमंलदारांना पदोन्नतीची भेट

Next Post

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add