नंदुरबार l प्रतिनिधी

ग्राहकतीर्थ स्व. बिंदू माधव जोशी प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संचालित महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या फलकाचे अनावरण बुधवारी झाले. नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांच्या हस्ते प्रवासी महासंघाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
दि. 1 जून रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या 74 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रवासी महासंघातर्फे फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघाची भूमिका मांडली.
तर आगार प्रमुख मनोज पवार म्हणाले की, गेल्या 74 वर्षापासून सर्वसामान्यांची जीवनवाहिनी ठरलेल्या एसटीने अविरत सेवा दिली आहे. प्रवासी महासंघाच्या कार्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष तळोदा येथील आर. ओ. मगरे, जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, संघटक योगेश्वर जळगावकर,
सदस्या पुनम भावसार, उपाध्यक्ष डॉ. गणेश ढोले, बी. डी. गोसावी, नितीन पाटील, साई बारसे, रोहित हुच्चे उपस्थित होते.
याशिवाय नंदुरबार स्थानक प्रमुख सागर पाडवी, वाहतूक निरीक्षक आर. जी. वळवी, वाहक विश्वास बागुल, पी.के. अहिरे, राजेंद्र पाटील, दिलीप वळवी, आर. आर. कोकणी, राजेंद्र पाटोळे, ज्योती साळी, लतिका खन्ना, आदी उपस्थित होते.









