नवापूर l प्रतिनिधी
सध्या देशात महागाई वाढत असून. खताच्या वाढत्या दरवाढीमुळे शेतकरी राजा त्रस्त झाला आहे. या खत दरवाढी विरोधात नवापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश गावित यांनी
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भाजीपाला, चणे, गौऱ्या, कडधान्य जीवनावश्यक वस्तू कुरियर च्या माध्यमातून भेट दिली आहे. तसेच दरवाढीबद्दल मोदी सरकारचा नवापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशात जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल इंधन दरवाढ होत असतानाच मोदी सरकारने खताचे भाव वाढ करून शेतकऱ्यांचा देखील कंबरडे मोडले आहे.
या वाढत्या खताच्या दरवाढीमुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी राजाला या मोदी सरकारला पुन्हा त्याच्या संकटात भर घातली आहे.नैसर्गिक आपत्ती दरवाढीचा फटका शेतीमालाला योग्य भाव नाही अशा एक ना अनेक संकटात असताना खताच्या दरवाढीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
या शेतकऱ्यांची बाजू मांडत व मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी नवापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष आकाश गावित यांनी गौरी, भाजीपाला चणे, कडधान्य जीवनावश्यक वस्तू कुरियरच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट केले आहेत.
यावेळी नवापूर राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष आकाश गावित, तालुका उपाध्यक्ष कान्हा सातारकर, शहर उपाध्यक्ष अजय कुराडे, शाहरुख मेमन, प्रफुल्ल वसावे, महेश वसावे आदि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.








