नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसैनिकांनी पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोचवून संघटन वाढवावे.नवापूर तालुक्यात स्वतंत्र नेतृत्व असायला पाहिजे यासाठी मेहनतीच्या जोरावर परिवर्तन घडवावे असे आवाहन खा.राजेंद्र गावित यांनी केले आहे
नवापूर येथील अग्रवाल भवनात शिवसंपर्क अभियान निमित्त शिवसैनिकांच्या मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मेळावाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी,जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, पालिकेच्या सभापती अरुणा पाटील,
उपजिल्हाप्रमुख हसमुख पाटील, उपजिल्हा संघटक मनोज बोरसे, युवसेना जिल्हाधिकारी ललित जाट,युवती सेनेच्या मालती वळवी उपस्थित होत्या. प्रसंगी जिल्हा समन्वयक दीपक गवते यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी खा. राजेंद्र गावित यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले, सरकार चालवित असतांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून महागाईच्या मुद्द्याला बगल देत आहे.
महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर केंद्र सरकार सीबीआय,ईडी, एनआयच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख आमाश्या पाडवी म्हणाले, शिवसैनिकांनी आता घाबरण्याचे काही कारण नाही. किती दिवस घाबरू राहणार. आता लढण्याची वेळ आली आहे. पक्षसंघटन वाढवण्यासाठी शिवसैनिकांनी लढले पाहिजे.
यावेळी जिल्हा संघटक राम वाडीले, तालुका संघटक देवका पाडवी, उपतालुका प्रमुख प्रवीण ब्रम्हे, कल्पित नाईक, युवा सेना उपजिल्हा अधीकारी दिनेश भोई,शहर प्रमुख अनिल वरुडे, माजी शहर प्रमुख शिवसेना गोविंद मोरे,मनोहर चौधरी,सचिन चौधरी,दिनेश खैरनार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या धाक दाखवा; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी
शहरात प्रत्येक प्रभागात, तालुक्यातील प्रत्येक गावागावात शिवसेनेची शाखा उघडा. आगामी कालावधीत नवापूर पालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. महाविकास आघाडी जरी असली तरी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शिवसेनेविषयी धाकधूक निर्माण की, पालिका निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय सत्ता मिळवता येणार नाही. जोपर्यंत चमत्कार दाखवत नाही तोपर्यंत कोणी नमस्कार करणार नाही असा टोला माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी लगावला.








