नंदुरबार – प्रतिनिधी
अतिदुर्गम नर्मदा नदी परिसरातील धडगांव तालुक्यातील हुंडा रोषमाळ खुर्द येथे २४ वर्षानंतर लालपरी गावात पोहचली असुन अक्कलकुवा – मोलगी – धडगांव – हुंडा रोषमाळ मुक्कामी बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.
धडगांव तालुक्यातील रोषमाळ खुर्द येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस गावात आली.या प्रवास सेवेचे उदघाटक सेवानिवृत कर्मचारी बलसिंग पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान स्वातंत्र्या नंतर 1996 ते 1998 या कळवधित अवघ्या दोन वर्षासाठी या गावात लालपरी सुरू करण्यात आली होती.

मात्र रस्ता खराब झाल्याने पुन्हा बस बंद करण्यात आली.त्यामुळे २४ वर्षापासूंन लालपरीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची प्रतिक्षा संपली व गावात बस पोहचताच गावकऱ्यांनी लालपरी सह अधिकाऱ्यांचे स्वागत केले.या भागातील नागरिकांसाठी हुंडा रोषमाळ ते धडगांव – मोलगी – अक्कलकुवा या मार्गाने हुंडा रोषमाळ खुर्द येथे मुक्कामी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. या बससेवेमुळे नर्मदा काठावरील रोषमाळ खुर्द, ठुट्टल, चिचकाठी, बोरसिसा, गोराडी, पिप्री, आमलीपाणी, अट्टी, केली, थुवाणी, भरड, सिक्का, कुंबरी, अकवाणी, नळगव्हण, कुकतार, जलोला अशा १९ गावातील नागरिकांना बससेवेची सोय होणार आहे.
या अक्कलकुवा ते हुडांरोषमाळ मधील एकूण अंतर ८५ किलोमीटर असून यात धडगांव ते हुंडा रोषमाळ मधील २४ किलोमीटर अंतर असल्यामुळे हुंडा रोषमाळहून धडगांव येथे नागरिकांना बाजारासाठी,शिक्षणाकरिता शाळेकरी मुलांना सोयीचे राहिल. हुंडा रोषमाळ खुर्द येथे बससेवा सुरु करण्यासाठी जि.प.सदस्या संगिता पावरा ,
मिाजी.जि.प.सदस्य हारसिंग पावरा , सहाय्यक वाहतुक अधिक्षक धुळे विभागीय कार्यलय श्री.वडनेरे , बाजीराव वसावे यांनी प्रयत्न केले.यावेळी दौलत पाडवी के.पी.पाटील, जयसिंग तडवी, पोलीस पाटील विजय पावरा, लालसिंग पावरा, बाबुलाल बारदु पावरा, शामसिंग पावरा,नाना पावरा, जयवंत पावरा,
रविंद्र पावरा, सुकलाल पावरा, मोहन शामसिंग पावरा, संतोष पावरा, जयसिंग पावरा, अनिल पावरा, मोहन बलसिंग पावरा, छोटुलाल पावरा, लक्ष्मण पावरा, आपसिंग पावरा, पंडित पावरा, निलेश पावरा, कैलास पावरा, विलास पावरा, किसन पावरा, गोपाल पावरा, गोवित वसावे हुंडा रोषमाळ परिसरातील ग्रामस्थ उपस्थिती होते.








