नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रेन योजनेतंर्गत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या देशभरातील बालकांशी दूरदृश्यप्रणालीव्दारे संवाद साधला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीडिओ कॉन्फरन्स रुम सभागृहातील या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेले सात अनाथ बालकेही सहभागी झाली होती.

यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7 अनाथ बालकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पत्र, पीएम केअर योजनेचे स्नेह प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेचे हेल्थ कार्ड, पी. एम. केअर टपाल खात्याचे पासबुक आदींचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा परिविक्षा अधिकारी जी.ए.जाधव, परिविक्षा अधिकारी व्ही.एन.लोखंडे, डी.एस.लांडगे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बालकल्याण समिती सदस्य मधुकर देसले,
बाल न्याय मंडळ सदस्य नितीन सनेर, सदस्य ॲड. सीमा खत्री , अनाथ बालक व त्यांचे नातेवाईक तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.








