खापर l प्रतिनिधी
शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात असे आवाहन पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी अक्कलकुवा येथे महाकाली मातेच्या प्रांगणात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील शिवसंपर्क अभियान उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात दि. २७ मे ते ३० मे दरम्यान सुरू असून पालघरचे खासदार राजेंद्र गावीत व १६ निरिक्षक तसेच धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे.

अक्कलकुवा येथील महाकाली मातेच्या प्रांगणात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार राजेंद्र गावीत यांनी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतांना सांगितले की, महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे यातुन आगामी काळातील निवडणुकीत शिवसेनेची एक हाती सत्ता येईल.
यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख संजय उकीरडे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी,सहसमन्वयक दिपक गवते निरिक्षक दुबे,युवा सेना जिल्हा प्रमुख ललित जाट, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, युवती सेना जिल्हा प्रमुख मालती वळवी, जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे, आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.
मेळाव्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाडवी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविंद्र गुरव, पंचायत समिती सदस्य जेका पाडवी,तालुका प्रमुख मगन वसावे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाडवी,पृथ्वी पाडवी, युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शहर प्रमुख रावेंद्र चंदेल, छोटू हाशमी, शहादा तालुका संघटक गणेश चित्रकथी, जगदीश चित्रकथी तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, आदि शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.








