नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील किराणा दुकान फोडून २६ हजार रुपये किंमतीचा किराणा माल चोरुन नेल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील भवराम रुपराम पटेल यांचे किराणा दुकान दि.२७ रोजीच्या रात्री फोडून चोरट्यांनी दुकानातील २६ हजार रुपये किंमतीचा किराणा चोरुन नेला होता.
याबाबत भवराम पटेल यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात संशयित आकाश रमेश वसावे रा.बर्डीपाडा खांडबारा, ता.नवापूर, मनोज लक्ष्मण पाडवी, गुलाब दिनकर नाईक दोघे रा.डोंगरीला खांडबारा ता.नवापूर या तिघांविरोधात भादंवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकेॉ.सुरेश मोरे करीत आहेत.








