Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातून तिघा अल्पवयीन मुलींचे अपहरण

team by team
May 30, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यातून तिघा अल्पवयीन मुलींचे अपहरण

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील परिवर्धा येथून एक व धडगाव तालुक्यातील मांडवी बु.बंधारपाडा येथून एक व नवापूर तालुक्यातील शेगवे येथून एक अशा तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील परिवर्धा येथून एका १५ वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले.

याबाबत मुलीच्या आईने शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित दीपक कृष्णा ठाकरे रा.भुते आकसपूर ता.शहादा याच्याविरोधात ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मेहरसिंग वळवी करीत आहेत.

तसेच धडगाव तालुक्यातील मांडवी बु.बंधारपाडा येथून एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या वडीलांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित संजू मानता पाडवी रा.भूजगाव ता.धडगाव याच्याविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय मनोरे करीत आहेत.

तर तिसऱ्या घटनेत नवापूर तालुक्यातील शेगवे येथून एका १४ वर्षीय मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण बैसाणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, एक जखमी

Next Post
वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, एक जखमी

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add