नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बालवीर चौकात शनिवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी 24 तासापूर्वी शुभमंगल विवाह झालेल्या वधू-वरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
शनिवार दिनांक 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी गवळी समाजातील चिरंजीव महेश उर्फ नंदलाल आणि चि. सौ. का. भावना या नववधू वरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आले. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची माहिती दिली.
अभिवादन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हा सचिव अशोक यादबोले, नंदलाल यादबोले, भावना यादबोले, वैशाली घटी, भाग्यश्री यादबोले, लीना हिरणवाळे,
भाग्यश्री हिरणवाळे, वृषाली गवळी, गणेश यादबोले, हर्षल कडीखाऊ, गौरव गवळी, दुर्गेश घटी, अक्षरा घटी, प्रफुल्ल राजपूत, विशाल हिरणवाळे, आकाश जव्हेरी,मंथन वानखेडे, आदी उपस्थित होते.