Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुरखेडा येथील सोसायटीच्या चेअरमनपदी सखाराम चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी भालचंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड

team by team
May 29, 2022
in राजकीय
0
धुरखेडा येथील सोसायटीच्या चेअरमनपदी सखाराम चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी भालचंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सखाराम सुदाम चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी भालचंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी नूतन संचालकांची एक बैठक घेण्यात आली त्यात चेअरमन पदासाठी सखाराम सुदाम चौधरी तर व्हाईस चेअरमन पदासाठी भालचंद्र चौधरी या दोघांनीच निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले होते.

त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सखाराम चौधरी हे सलग चौथ्यांदा विकास सोसायटीच्या चेअरमन पदी निवडून आले आहेत.

यावेळी संचालकपदी मणिलाल चौधरी, रवींद्र चौधरी, नरेंद्र चौधरी, उमेश चौधरी, वामन पाटील, जयेंद्र पाटील, काशिनाथ पाटील, मणिलाल लोहार आणि महिला प्रतिनिधी शोभाबाई चौधरी, उषाबाई पाटील आदींची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दिलीप चौधरी, उमाकांत चौधरी, रमाकांत चौधरी, पुरुषोत्तम पाटील, मधुकर चौधरी, यांनी विशेष मोलाचे सहकार्य केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घनश्याम बागल यांनी काम पाहिले तर सहाय्यक म्हणून सचिव प्रवीण खैरनार यांनी याकामी सहकार्य केले. निवड झाल्यानंतर चेअरमन सखाराम चौधरी, व्हाईस चेअरमन भालचंद्र चौधरी आणि सर्व संचालकांनी शेतकरी हिताला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे सुरु असलेल्या विविध योजनांचा सोसायटीच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या मुख्य समन्वयकपदी प्रा.हितेश पटेल यांची नियुक्ती

Next Post

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया तील विद्यार्थ्यांचे जी – पॅट राष्ट्रीय परीक्षेत यश

Next Post
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया तील विद्यार्थ्यांचे जी – पॅट राष्ट्रीय परीक्षेत यश

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया तील विद्यार्थ्यांचे जी - पॅट राष्ट्रीय परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add