म्हसावद l प्रतिनिधी
शहादा परिसरातील नांदरखेडा ता शहादा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय, शहादा (नंदुरबार) येथील कृषिदुत दाखल झाले.

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती, माती व पाणी परीक्षण, किड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, जनावरांचे संगोपन आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण या कृषीदूतांकडून करण्यात येणार आहे.
यामध्ये कुणाल कैलास पाटील, तुषार राजेश निकुंभ, अमरदिप मिलिंदकुमार गजरे, मयूर अर्जुन तायडे, भावेश महेद्र पाटील, मनीष दिनेश पाटील, हे कृषीदुत गावात राहून पुढील दहा आठवडे पदवी आत्मसात केलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी त्यांनी सरपंच शालू निलेश पाटील, पोलीस पाटील विनोद मोतीलाल पाटील प्रगतिशील शेतकरी सुभाष पाटील, भरत पाटील, सुदाम भाईदास पाटील, टिला जंगेश पाटील, अशोक पाटील, ललित पाटील, शेलेश पाटील,जयेश पाटील यांच्या उपस्थितीत गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल कार्यक्रम समन्वयक प्रा.सी.यु पाटील व कार्यक्रम अधिकारी प्रा.रुपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.









