नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबारकरांनी आज शून्य सावली दिवस अनुभवला यासाठी नक्षत्र छंद मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते.
आज दि.27 रोजी नंदुरबार या ठिकाणी सूर्य डोक्यावर 12:32 आला व अलाहाबाद या शहरात प्रमाण वेळेनुसार बारा वाजले असतील परंतु 8 रेखावृत्त यांचा फरक असल्याने नंदुरबारला ही घटना 12:32 वाजेला बघायला मिळाली या प्रसंगी काही विद्यार्थी भूगोल प्रेमी यांनी हा अनुभव घेऊन निरीक्षण केले .
त्यासाठी मंडळाने काही उपकरणांची निर्मिती केली होती व त्याद्वारे निरीक्षणे नोंदवली त्यात उत्तरायण दक्षिणायन चे मॉडेल, पृथ्वीचे कललेल्या असाचे मॉडेल, सोलर डायल. या पद्धतीने विविध मॉडेलच्या आधारे हा प्रसंग अनुभवता आला.
त्या वेळी नक्षत्र छंद मंडळाच्या समन्वयक तथा खगोल अभ्यासक चेतना पाटील श्री.आशापुरी माता फाऊंडेशनचे संस्थापक दिनेश पाटील ,आर्या पाटील,गिरीष चव्हाण, मंगेश अहिरे(इतिहास संशोधक पुणे),दिपाली सुर्यवंशी,वैष्णवी पाटील, वेदका मराठे, आर्णव पाटील, दर्शन सुर्यवंशी उपस्थित होते.